mazionjal

रविवार, १८ डिसेंबर, २०१६

Short story : बबन द बबन्या

बबन द बबन्या

माझ्या ऑफिस मध्ये एक बबन नावाचा मुलगा आहे.
तस त्याला सगळे बबन्याच म्हणतात , आता तर इतकी सवय झालेली त्या नावांची त्याला कि त्याची बायको पण आहोच्या ऐवजी बबन्या बोलली तर  तो  देतो.
बबन्या म्हणजे थोडासा बेन  कॅरेक्टर , एक काम एका सांगण्यात पूर्ण करेल तो बबन्या कसला . आपण जर काही गावातून आन असं सांगितलं तर जास्त काही विचारता हे आपलं निघत आणि अर्ध्या रस्त्यातून परत फोन करत "ते काय म्हनला होतात वो म्याडम तुमी , च्या आईला जॅम इसरलोच "मग सांगितलं कि परतनिघणार आणि दुकानात पोहोचल्यावर परत फोन येणार हे नक्की " ते तुमि बोललेला  बबन्या ते आन , पण ते म्हंजी नक्की काय तेच इसरलो बघाते ह्या नासांगा , ते काहीतरी कॉम्पुटर  होत बघा " असं म्हणून दुकानातील माणसा जवळ फोन दिला जातो आणि मग ते सांगायचं आपण त्या माणसाला . नशीब आपलंएवढाच कि कॉम्पुटर  असेल तर त्या रिलेटेड दुकानात हे जात .
तर असा हा आमचा बबन्या एक दिवस त्याच्या टेम्पो  मधून एका लग्नासाठी बायका आणि माणसं , त्याच्या  गल्लीतली  होती सगळी निघालेड्राइवर आमचाबबन्याच . तशी गाडी छान चालवतो तो
निघाले निम्मा रास्ता गल्यावर टेम्पो बंद , काही केल्या सुरु होईना , मग लक्षात आलं कि डिझेल संपलेलं ,,,, जवळपास कुठे पंप पण नव्हतासगळे शिव्या देतटेम्पो ला धक्का देत होते१०-१२ कमी पर्यंत सगळ्यांनी धक्का देऊन शेवटी तो टेम्पो , त्यातील ड्राइवर सीट वर बसलेला बबन्या आणि सगळ्याच्या  टेम्पो मधील  बायका डिझेल पंप वर आणलाधक्का देता देता तर काही ऊन मुळे बेशुद्ध पण पडले . तसाच त्यांना शुद्धीवर आणून परत धक्का द्यायला परावृत्त करून एकदाची तीवरात  डिझेल पंप वर आली . डिझेल भरल्यावर एक जण
बबन्याला म्हणाला, “  माग एक डरम आहे त्यो पण घे भरून नंतर येताना पाराब्लेम नको .” सगळ्यांनी त्याला संमती दर्शवली “व्हाय घे भरून”
तसा बबन्या  एकदम ऐटीत बोलला " तो फुल हाय बघा , अडल्या नडल्या साठीलोकांचा पाराच वाढला ,  दात ओठ खात त्याला तिथेच  धुतला .

शनिवार, १७ डिसेंबर, २०१६

आठवणीं

आठवणींच्या घोळक्यात
मनाचा होतो गोंधळ
प्रत्येकीचं ऐकण्यात
त्याच हरवत मीपण ।।

प्रत्येक आठवण वेगळी
रागावलेली , हिरमुसलेली
हसरी , लाजरी , आनंदी , भारावलेली
रुसलेली,रडवेली
हळवी , आतुरलेली

मनासाठी प्रत्येक आठवण
हि त्याचीच
तीच ऐकून घेणं , तिच्यात रमण
हि खेळी हि त्याचीच

मन आठवण
जणु सरोवरावर उठणारे तरंग
आठवणींनाही असतात
वेगवेगळे रंग

मन बिचारं आपलं
रमत ह्या आठवणीत
भानावर आल्यावर
कळत त्याला
हे तर जमा झालं ठेवणीत ||

शुक्रवार, १६ डिसेंबर, २०१६

माउली चा गजर

माउली , माउली , माउली चा गजर
टाळ मृदूंग सवे , गजबजे भीमातीर
देव भक्तांचा संगम
होत असे पंढरपुरी
वारी घेऊन येतात
दरवर्षी वारकरी ।।

दिंड्या पताका घेऊन
टाळ मृदूंग गजरी
विठ्ठलाच्या नामाने
गजबजे पंढरपुरी ।।

कटीवर कर सावळा सुंदर
उभा युगान युगे , विठुमाझा विटेवर

पाणावती डोळे , होता दरशन तुझे
नाही काही आता , मागणे माझे ।।

आराधना




अवर्णनीय तू, अनादी तू
आदी तू, अंत तू
सृष्टीतील चेतना तू
सर्व चराचरात तू ।।

जीव जडला तुझ्यावर
वेड लागले तुझे
दर्शनाची आस आता फक्त माझ्या उरी वसे ।।

आतुरले नयन
कासावीस झाले मन
आले शरण तुला
कर मुक्त हे देहासन ।।

सोडले जिवलग सखे
अंतरी तूच वसे
तूच माता , तूच गुरु
तूच सखा तूच बंधू
विनविते दासी तुझी
चरणाशी प्रीती माझी
दे दर्शन एक वारी
सफळ होईल आराधना माझी ।।

भक्ती

देव शेणमातीचा
देव सोन्याचांदीचा
देव पाषाणाचा
देव तांब्यापितळ्याचा
जसा ज्याचा भाव, तसा देवाचा असे ठाव ,
ज्याची जशी भक्ति , तशी मिळे देवाची प्रचिती ।।

शोधिसी देवा आसमंतात
तोच वसे फक्त तुझ्यात
देव निर्गुण निराकार
आदी अंत पुर्ण साकार  ||
देव निर्विकार व्यापक
दृश्य , अदृश्य निर्विकल्प
         देव सर्व व्यापक
       देव अनेकांत एक
देव सगळ्याहुन  थोर
स्थूल सूक्ष्म परमात्मा परमेश्वर ।।

संकटे हि अमाप
तारणहार तो एक
असमाधान हा रोग
नाम तुझे हे त्यावरील औषध ।।

तळमळ वाढे जीवाची
आस फक्त तुझ्या दर्शनाची
ओढ लागु दे तुझी
गोडी वाढू दे नामाची ।।

शनिवार, १० डिसेंबर, २०१६

समुद्र ओढ

अशी कोणती ओढ आहे
ह्या समुद्राची
कि साऱ्या नद्या त्याच्याकडे
धावत येतात आणि समुद्रच होऊन जातात

                                                असं काय आहे ह्या जलधि जवळ
                                                कि हर एक लाट , किनाऱ्या जवळ जाऊन परत मागे फिरते

असं काय गुपित आहे
ह्या रत्नाकरा कडे
कि धरा सुद्धा ह्यात
एकरूप होऊन जाते

                                     कदाचित अथांग , विशाल शांत
                                      तेवढाच रौद्र , उग्र
                                      गूढ अफाट कणखर
                                     जलाय समंजस समजूतदार
                                     अमर्याद असून मर्यादा सांभाळणारा आहे म्हणून 

शुक्रवार, २ डिसेंबर, २०१६

सूर्याचा देश




एकदा बघायचाय सूर्याचा देश
लख्ख उजेडात न्हायलेला प्रदेश

जिथे सूर्यकिरणं दव बिंदुला देतात एक नवी झळाळी
उबदार हवेची असतें घोंगडी
स्वच्छ सुंदर आकाश , स्वच्छ सुंदर प्रकाश
स्वच्छ हवेच्या शुद्ध उजेडात

जिथे नसतोच मुळी काळोख
काळोखाच्या पोटातील आक्रोश
नसतात आर्त किंकाळ्या अन मनामनाच्या लढाया

सूर्याच्या देशात असतो म्हणे एक सागर
आनंदाच्या लाटा सतत असतात त्यावर
म्हणूनच एकदा बघायचाय सूर्याचा देश
आनंदानं भरलेला लाटांचा प्रदेश