mazionjal

बुधवार, १९ फेब्रुवारी, २०२०

पुंजिकस्तल…. एक अप्सरा


काय झालं , कश्यामुळे झालं , नक्की काय घडलं हे त्या स्वर्ग नागरी चा  राजा इंद्र आणि सौंदर्याची साम्रादनी पुंजिकस्तल   अप्सरा  , ह्या दोघांनाच माहित , पण त्या दिवशी , देव इंद्र खूप संतापले होते पुंजिकस्तले वर त्यांचा एवढा जीव .. पण आज ते तिच्यावरच चिडले होते . आणि पुंजिकस्त ला....  ती फक्त आसवं गाळीत उभी होती ..
सगळे तिच सांत्वन करत होते काय घडलय ते कुणालाच कळत नव्हतं .
देव इंद्र  : पुंजिकस्तला  आज तू मला मन खाली घालायला लावलीस .. का असं केलस ? माझा केव्हढा जीव तुझ्यावर .. तू मला सांगू शकली असतीस ... तू का नाही सांगितलं ... एवढं सगळं घडलं आणि मला काहीच कल्पना नाही ... नाही ... हे असच होत राहील तर ... " देव इंद्र पोट तिडकी ने पुंजिकस्तले  ला बोलत होते रागवत होते ... "अ ग काय कमी होत तुला इथे , सगळी सुख आहेत ह्या इंद्र लोकात ..... का पण का असं करावंसं वाटलं तुला ... आज तू मला शरमेने सर्व देव लोकं पुढे मान खाली घालायला भागपाडलंय ...."
पुंजीक्सतला रडत रडत इंद्र देवांना बोलली "मला माफ करा खरंच चुकले मी ... मी असं वागायला नको होत ... माझी बुद्धी कशी फिरली नाही माहित ... मला असं का करावंसं वाटलं नाही माहित .... पण ह्या कृत्या बद्दल मला माफ करा .... मला त्या दैवी साधू च्या शापा पासून वाचवा देवा ... " 
इंद्र देव  " साधू .... अ ग  ते नुसते साधू नाही महान तपस्वी आहेत .... त्याच्या तपस्येच तेज त्यांच्या चेहऱ्या कडे बघूनच लक्षात येत ... आणि तू.... तू त्यांना असं वागवलास , ते जरी एका माकडाच्या रूपात असले तरी ते खूप मोठे तपस्वी आहेत आणि आता त्यांच्या शापा पासून तुला कोण वाचवणार " 
रंभा ह्या दोघांच्या संभाषण ऐकत होती तिला पुंजिकस्त ला  चे रडणे बघवले नाही , ती तिची बाजू मांडायला त्या दोघं मध्ये पडली 
रंभा : "देव इंद्र ... मला नाही माहित काय झालाय ते पण मला वाटत तुम्ही एकदा पुंजीक्सतले च म्हणणं ऐकावे .. तिला झालेल्या गोष्टी बद्दल खरंच खूप पश्चाताप होतोय ... ती त्या बद्दल माफी सुद्धा मागते आहे ..मला वाटत .." 
इंद्र : "रंभा ,,,, तू नको पडू ह्यात तुला नाही माहित हिने काय केलय,,,,, हिला ह्या इंद्र लोक मधल्या सुखाचा, आरामाचा , ऐश्वर्या चा  कंटाळा आला होता म्हणून हि पृथ्वी लोकात विहार करायला गेली ... तिथे गेली तर हिने ते सुख उपभोगाव ना तर नाही ... हिला तिथे लीला कराव्याशा वाटल्या ,,, आणि हिने एका महान तपस्वी माकड रुपी योगी जेव्हा ते त्याच्या तपस्ये मध्ये लीन होते ,,, पद्मासनात शांत बसले होते . हिने त्यांना पहिले आणि एक माकड कस बसलंय , म्हणून त्यांना काही फळ मारून फेकली  आणि एवढंच नाही तर दगड सुद्धा ....   ,, माझ्या च्या ने तर सांगावंल सुद्धा जात नाही इतकं मोठ्ठ कृत्य हिने केलं ... मग काय त्या तपस्वीची तपस्या भंग पावली आणि त्यांनी हिला शाप दिलाय " रंभा : " शाप .... " 
इंद्र :  "हो .. हो शाप दिलाय .. कि जस काही हि कोणाच्या प्रेमात पडेल हि सुद्धा एक माकड बनून राहील " 
रंभा :  " बापरे ... मग आता "
इंद्र :  " आता काय ... पश्चताप दुसरा काही उपाय नाही " 
रंभा :  " देवा असं नका हो म्हणू असेल ना काही तरी उपाय उपशाप नक्की काही तरी असेल ,, आपण जाऊ यात का सगळे ह्या योगि ना भेटायला हिच्या वतीने आपण सगळे त्यांची माफी मागू ,, 
इंद्र : "ते आता शक्य नाही आता कुठे शोधणार आपण त्यांना हि तपस्वी लोक घोर रानात , अति थंड बर्फाळ प्रदेशात किंवा उष्ण वाळवंटात तपस्या करतात कि जेथे त्यांना कोणी त्रास देणार नाही ... आता ते कुठे असतील नाही कळणार "
रंभा :  " मग आता " 
पुंजिकस्तला:  " इंद्र देवा मला माफ करा पण ह्यावर काही तरी उपाय सुचवा " 
इंद्र खूप विचार करून मग 
इंद्र : "ह्यावर एकच उपाय तू ब्रह्म देवांना भेट तेच काय ते उपाय सुचवतील " 
हे एकूण पुंजिकस्तला  ला थोडा धीर आला
ती ब्रह्म लोकात आली आणि आल्या आल्या तिने ब्रह्म देवांचे पायच धरले 
पुंजिकस्तला: : " देवा मला माफ करा मला ह्या शापा पासून वाचावा , मला योग्य मार्ग दाखवा , माझी चूक झाली , मला उपशाप .द्या मार्ग दाखवा देवा " 
ब्रह्म देवांना तिने झालेलं सगळं सांगितलं . 
ब्रह्म देव :  " झाले ते योग्य नाही झाले , तू असं वागायला नको होते ... एका सिद्ध-योगी ला , तो जेव्हा त्याच्या तपस्येत लीन असताना त्याला त्रास देणं म्हणजे घोर पाप…. पण झालेल्या गोष्टीचा तुला पश्चाताप होतोय ... आणि जे तू वागली  ते योग्य नाही ह्याची  तुला जाणीव होतीय ... ...   हि चांगली गोष्ट आहे ..."  
(खर तर ह्या सगळ्यात नियती लांब उभं राहून हसत होती आणि नवीन काही तरी भव्य दिव्य होणार ह्याची रचना करत होती ) ब्रह्म देवांनी पुंजिकस्तले कडे बघितले त्यांना नियतीचा खेळ आणि दैवाची योजना समजली , आणि त्यांनी ह्यावर एक उपाय पुंजिकस्तलेला सांगितलं 
ब्रह्म देव : “ तू पृथ्वी लोकात जा तिथे तुझी भेट एका महान योद्धा , बलशाली, शूर वीराशी होईल त्याच्या पासून तुला एक वानर रुपी तेजस्वी , महापराक्रमी , बलशाली ,शिव अंश असलेला पुत्र होईल , तो शिवाचा अंश असलेला असेल आणि त्या महान पुत्राच्या योगाने तुला उपशाप मिळेल " 
ह्या ब्रह्म देवाच्या वाणी ने पुंजिकस्त ले ला  थोडे बरे वाटले , आणि देवांच्या म्हणण्या प्रमाणे ती भूलोकात राहू लागली .
बरेच वर्ष तिथे तिने तपस्या केली , आणि एक दिवस  जंगलात  ती ध्यान धारणा करत असताना सिहांच्या डरकाळ्या चा आवाजामुळे तिचे  ध्यान तुटले , काय झालंय म्हणून बघायला ती आवाजाच्या दिशेने जाऊ लागली ,वाटेतील झाड कोलमडून पडली होती , झाडाच्या खोडांवर नखांचे  चे व्रण उमटले होते. पक्षांच्या  किलबिलाटा ने कोलाहल मजला होता , कोणी तरी कोणाला तरी उचलून फेकत आहे असे मोठ मोठे आवाज येत होते ,,,  एखादे मोठे द्वंद्व  युद्ध सुरु होते . अजून थोडं पुढे गेल्यावर जे तिने बघितलं त्यावर तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता .  एक मोठ्ठे भारदस्त , बलशाली , उंचपुरे अर्धे मानव आणि अर्धे माकड असे शक्तिशाली कुणी तरी एका सिंहा शी युद्ध करत होते , आणि तिने जे पहिले ते तर खूपच विलक्षण होते त्या शूरवीराने एका क्षणात त्या सिंहाच्या  खालचा जबडा एका हाताच्या चार बोट आणि वरचा जबडा दुसऱ्या हाताच्या चार बोटानी पकडून त्या सिंह ला फाडून फेकले आणि अचानक सर्वत्र शांतात पसरली, काही क्षण कोणीच काही हालचाल नाही , पानांची सळसळ नाही कि पक्षांची फडफड नाही , सर्व तो क्षण बघून स्तब्ध झाले , पुंजिकस्त लेला तर काही सुचतच नव्हते काय घडले आणि तिने काय पहिले ह्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता
आणि  अचानक त्या वीराचे लक्ष पुंजिकस्त ले कडे गेले , तिला बघताच तो काही क्षणा आधी आपण काय करत होतो हे विसरूनच गेला , तिच्या सौंदर्याची मोहिनी त्याच्यावर जादू सारखे काम करत होती आणि तो त्या मोहिनीच्या हळू हळू  आधीन होत होता ,  ती त्याला विचारते आहे कि तुम्ही कोण , कुठून आलात , हे काय झालं  वैगरे पण तिच्या बोलण्याकडे त्याच अजिबात लक्ष नव्हतं तो फक्त आणि फक्त तिला न्याहाळत होता , तिचे लालचुटुक ओठ , गोरा वर्ण , कमनीय बांधा , कोरीव भुवया , निळे डोळे , मधूनच एक केसाची बट तिच्या गुलाबी गालाला  खेळत होती , बोलताना सुद्धा डाव्या गालावर पडणारी खळी त्याच लक्ष वेधून घेत होती ,  हे सगळं बघून तो हरवूनच गेला ...   हि कोणी तरी स्वर्गीय अप्सराच ह्यावर त्याचा ठाम विश्वास बसला.
आणि तो तिच्या प्रेमात च पडला, पुंजिकस्त ला तर जेव्हा तिने पहिल्यांदा त्या शूरवीराला पहिले तेव्हाच ते तिला आवडले  आणि ह्याच वेळेस  योगी ने दिलेला शाप असर करू लागला आणि ती वानर रूपात बदलली , काही क्षण दोघांना हि काहीच कळले नाही पण नंतर पुंजिकस्त ला रडू लागली त्या शूर वीराने तिला ह्या सगळ्याचा काय अर्थ आहे .. हे असे काय घडले तू अचानक असे रूप कसे बदलले विचारले , रडतच पुंजीक्सतला ने तिच्या बरोबर घडलेली सर्व हकीकत त्यांना सांगितली , त्यांनी तिचे सांत्वन केले , आणि ते तिला त्याच्या राज्यात घेऊन आले ,,, नगरातले सर्व लोक हे वानरर प्रमाणेच होते ,,, हे पाहून तिने त्यांना विचारले कि तुम्ही कोण आपण कुठे आलोत , त्यावर त्यांनी स्वःची ओळख करून दिली , मी वानर राज केसरी आणि हि सर्व  माझी प्रजा आहे . मी  कधी हि माणूस आणि कधी हि  वानर रूप धारण करू शकतो . तू निःसंकोच पणे माझ्या राज्यात रहा... खरं तर  मी तुला पाहिल्यादा  बघितलं तेव्हाच तुझ्या प्रेमात बुडालो तू माझ्या बरोबर विवाह करशील .... ह्या मागणीला तिला नाही म्हणूच शकली नाही आणि खूप थाटमाटात  वानर राज केसरी आणि पुजिकस्तल ह्याचा विवाह पार पडला आणि ती ह्या पुढे अंजनी नावाने वानर राणी म्हणून  ओळखली जाऊ लागली. वानर राज केसरी हे निस्सीम शिव भक्त होते , आणि आता अंजनी सुद्धा त्यांच्या बरोबर शिव भक्तीत लिन झाली , आपल्याला  शिवा सारखा पुत्र व्हावं म्हणून त्यांनी प्रार्थना केली आणि त्यांची भक्ती बघून महादेवाने ते मान्य हि केले ,
मध्यंतरी अयोध्ये मध्ये राजा दशरथ हे पुत्र प्राप्ती साठी पुत्रकामेष्टि यज्ञ करत होते , ह्या होमाच्या अग्नी मधून अग्नी देवांनी त्यांना पवित्र असे पायस दिले कि जे ग्रहण केल्याने राजाच्या राण्यांना तेजस्वी असे पुत्र होतील . त्यातील थोडे पायस हे पावन देव चोरून अंजनी च्या हातावर देतात आणि ते तिला ग्रहण करण्यास सांगतात ते घेताच तिला काही तरी दिव्य आपल्या बरोबर घडणार आहे ह्याची जाणीव होते, पावन देव तिला सांगतात अंजनी आता तू एका शक्तिशाली , बुद्धिमान , धाडसी , चपळ आणि उडण्याची ताकद असलेल्या पुत्रास जन्म देशील , आणि त्या बरोबरच तुझा शाप हि  नाहीसा होईल . लवकरच अंजना एका गोंडस , गुटगुटीत वानर पुत्र , बलशाली हनुमानास जन्म देते आणि त्याच  अंजनेय असं नाव ठेवते आणि त्याच्या बाळलीलां मध्ये हरवून जाते

शुक्रवार, ३१ जानेवारी, २०२०

गॅस cylinder


गॅस cylinder म्हणजे आम्हा बायकांचा खूप जिव्हाळ्याचा विषय
त्यातून  जर सिलेंडर संपलं आणि दुसरं भरलेलं नसलं म्हणजे बापरे ....
तो पूर्ण दिवस मग धावपळ , पार्सल मागव , त्यातून त्रिकोणी कुटुंब असेल तरठीक पण  जर सासू सासरे दीर अशी joint  फॅमिली असेल तर मग तर प्रसंग खूप बाका , बाका काय तारेवरची कसरतच ... सिलेंडर  घ्या  
ते  गाडी वर पुढे टाका गॅस agency मध्ये जा , cylinder घेण्याचा रांगेत उभे राहून, भरलेला सिलेंडर परत गादीवर घेवा आणि घरी  आणा.... हुश्श  , म्हणजे पूर्ण सकाळ गेली वाया

मंगळवार, २८ जानेवारी, २०२०

चल ना...परत एकदा


ए ऐक… ना ... चल ना ...  चल भेटू एकदा नव्याने परत
थोडा वेळ विसरूयात  सध्याच जग
ठेवू बाजूला थोडावेळ तीच - तीच रोजची काम
आज भेटू परत एकदा त्याच आपल्या बाकावर
किती वेळ गप्पा चालायच्या न आपल्या
सगळं जग विसरून , आपलच फक्त एक वेळ जग होत….

“हो .. हो माहिती आहे…” आता ते जग सत्यात उतरलय
आणि त्यात आपली दोन मुलं पण आहेत ,
पण तरीही आज चल ना परत त्या पाऊल वाटेवर
थोडा वेळ तसेच हातात हात घेऊन चालू आणि परत तेच विषय घेऊन बोलूयात
 नवीन बदल  सगळे  सोडून परत तेच जुन आयुष्य  थोडावेळ जगूयात
विसरूयात  आपल्या जवाबदाऱ्या ,काळज्या , चिंता थोडा वेळा करता
आणि घेऊ चोरून थोडे क्षण परत एकदा
ए ऐक ना ... चल ना ...  चल परत एकदा

Gauri Ekbote

सोमवार, २३ डिसेंबर, २०१९

what to do, want to do, something something ...

आज पासून शाळेला सुट्टी we are getting
what to do, want to do, something something ...

आई म्हणते camping comping
बाबा म्हणतात reading reading
आम्हाला तर खेळायचे बॅट  अँड balling
what to do, want to do, something something ...

शाळे पासून थोडे दिवस मिळालाय ब्रेक
वही नाही, पुस्तक नाही, नुसतं gaming gaming
टीचरानी दिलाय होमवर्क , we are ignoring ignoring
तो सोडून what to do, want to do, something something ...

बाबा ऑफिस आई busy in Cooking  Cooking
ताई सुरु  फोन वर chatting chatting
आजी करत असते सतत chanting chanting
प्रश्न मला पडतो एकच what to do, want to do, something something ...



Gauri Ekbote


मंगळवार, १ ऑक्टोबर, २०१९

तुझ्यासाठी ....




आपण खूप म्हणतो कि असं काही नसत हो...  हे फक्त पुस्तकात  किंवा सिनेमातच होत ,
खरं आयुष्य खूप वेगळं असत , किती त्रास असतो , हे मनोरंजना साठी ठीक   आहे वैगरे वैगरे ....
पण आज हि अशी माणसं आहेत कि जी खूप ,,, अतिशय प्रामाणिक असतात , आपली मत आपले संस्कार जीवापाड जपतात .
एखाद्याच मन मोडणं त्यांना लवकर नाही जमत , आणि जेव्हा अशी व्यक्ती प्रेमात पडते तेव्हा .... तेव्हा ते अगदी जीव ओतून , मनाच्या अगदी खोल तळा पासून बाहेर पर्यंत प्रेम करतात ,प्रेमात  झोकून देणं म्हणजे काय हे ह्यांना पाहिल्यावरच लक्षात येत , प्रेमात आंधळे नाही पण वेडे नक्की होतात . त्या व्यक्ती साठी वाट्टेल ते ... वाट्टेल तेव्हा काही हि करू शकतात ... हो ना ..... असाच आहे सुजय .  सुजय साधा सरळ ,प्रेमळ आणि तेवढाच रांगडा . उंची ने ६फूट, निळे डोळे  , पिळदार शरीरयष्टी ,सावळा वर्ण , आणि कायम बेअर्ड style change कधी  बोल्ड beard style , कधी full Beard , कधी cool Beard style , तर कधी teenagers style , कोणतीही style त्याला इतकी सूट होई कि ती त्याच्या साठीच तयार केली असं वाटे ,त्याला बघताच एकही मुलगी परत  वळून बघणार नाही असं शक्यच नाही , मुलींच्या स्वप्नातला tall , Dark , handsome charming असा होता. त्याच  हे stylish राहणं ,stylish वागणं एक  impression सोडून जायच, एकदा कोणाला भेटल्यावर त्याला कोणी विसरूच शकत नव्हतं .मुली तर फिदा होत्याच त्याच्यावर.

आई वडील मोठा भाऊ , एक बहीण आणि सुजय असं हे पंचकोनी कुटुंब , पंचकोनात जसा एक कोन थोडा लांब असतो तसा सुजय होता घरात सगळ्यात वेगळा , अतिशय stylish पण तितकाच समंजस, अतिशय आगाऊ पण तितकाच शांत, नुकतंच मास्टर डिग्री संपवून त्याला जॉब लागलं होता , त्यामुळे घरातले आणि तो स्वतः खूप खुश होते , सुजय मुळातच हुशार त्याच्या हुशारी मुळे , त्याच्या हजार जबाबी पणा  मुळेच त्याच्या HR ने त्याला पहिल्याच  मीटिंग मध्ये ऑफर लेटर दिल होत ,  पगार पण चांगला होता . मग काय कॉलेज आणि ते संपत नाही तोच छानसा जॉब सगळं कस मस्त चाललं होत आणि ठरल्या प्रमाणे होत होत. ऑफिस मध्ये सुद्धा तो खूप लवकर रुळला .

ऑफिस मध्ये सुनंदा हि त्याची Colleague , सुजय आणि सुनंदा एकाच दिवशी ऑफिस जॉईन केलेलं . सुनंदा हि मुंबई ची पण जॉब मुळे  ती बंगलोर ला शिफ्ट झालेली , ती एका private  Girls Hostel ला राहत होती सुनंदा हि  हुशार , देखणी, महत्वकांक्षी मुलगी कुठल्याही मुलाला बघितल्यावर नक्की वाटेल “काय सुंदर मुलगी” आहे अगदी अशी.  अतिशय stylish आणि तितकीच हुशार . एकाच प्रोजेक्ट वर एकाच दिवशी ती दोघे appoint  झालेली , दोघेही स्वभावाने , वागण्या बोलण्याने , आवडी निवडी हि same . ह्या मुळे हळू हळू त्यांची मैत्री झाली , रोज च्या भेटीगांठीं मुळे मैत्री वाढत जाऊन घट्ट झाली. दोन वर्ष केव्हा संपले हे कळलं पण नाही.

ऑफिस ला आता workload  हि वाढला होता पण सुनंदा बरोबर असली कि वेळ कसा जाई हे सुजयला कळत नसे . सुजय ला सुनंदा आसपास असली कि आवडे , सुनंदा हि त्याच्या बरोबर  मिळून मिसळून वागत होती,  ह्या दोन वर्षात मैत्री इतकी घट्ट झाली कि
सुनंदा सुजय च्या घरी पण येऊ जाऊ लागली ,थोड्याच दिवसात ती घरातीलच आहे इतकी रुळली होती.  सुजय ला सुनंदा आवडू लागली , तो  तिच्या मनमोकळ्या स्वभावामुळे  तिच्या प्रेमातच पडला, तिची ऑफिस मध्ये काम करण्याची पद्धत , कामाच्या बाबतीत पद्धतशीरपणा , सगळ्यांशी मिळून मिसळून बोलणं , सुजय ला आवडू लागलं ,  सुजय सुनंदाच्या मोकळ्या स्वभावला प्रेम समजू लागला , आणि तिच्या प्रेमात आकंठ बुडाला . ऑफिसला ती दोघे बरोबर जात ,  तो तिला तिच्या हॉस्टेल वरून pick करत असे .आणि संध्याकाळी सोडत असे . संध्याकाळी कधी कधी पाणीपुरी पार्टी , भेळ पार्टी तर कधी कट्ट्यावर गप्पा रंगत . सुजय साठी खूप मस्त मोरपंखी दिवस होते ते. पण ह्या दोन वर्षात  सुजय ची तिला विचारायची हिम्मत नाही झाली , ती कदाचित नाही बोलली तर ... ह्या विचारानेच तो शब्द ओठात गोठवत.

आता दोघांना हि ह्या कंपनी मध्ये दोन वर्ष झाली , सुनंदा ला मुंबई ला चांगल्या पगाराची ऑफर आली आणि ती तिने accept हि केली , एकतर ऑफर hometown ची होती दुसरं म्हणजे  पगार आणि पोस्ट पण चांगली होती  खूप आनंदात होती , सुजय मात्र हिरमुसला आता ती रोज नाही भेटणार ह्या विचारानेच त्याला काय करावं काही सुचत नव्हतं    पण सुनंदा साठी आकाश ठेंगण होत , ती खूप उत्साहात होती . , आज सुजय ने ठरवलं,  आज सुनंदाला सगळं मनमोकळं करून सांगायचं ... संध्याकाळी जाताना त्याने गाडी एका कॉफी शॉप जवळ थांबली थोडावेळ बसुयात .. दोघांनी कॉफी घेतली , सुरुवात कुठून करावी हे त्याला समजत नव्हतं ... पण आज तिला सांगायचंच त्याने ठरवलं  आणि सुनंदाचा हातात हात घेऊन “सुनंदा माझं खरंच खूप प्रेम आहे तुझ्यावर नको ना जाऊ मला सोडून ,,, काय वाईट आहे ह्या नौकरीत…. खूप छान संसार होईल आपला.  थांब ना…. नको जाऊ मला सोडून . खूप खूप प्रेम करतो मी तुझ्यावर तुला कधीच अंतर नाही देणार , तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल , खूप सुखात ठेवेल तुला .. थांब ना माझ्या साठी .”  सुनंदा हे ऐकून सुन्नच झाली काय बोलावं तिला कळत नव्हतं , हा असं काय बोलतो आहे , कस react  व्हावं तिला समजत नव्हतं .

सुनंदा एक करिअर oriented मुलगी  , तिची स्वतः ची खूप मोठ्ठी स्वप्न होती , खूप पैसे कमवायचे , नवीन नवीन देश बघायचे, लग्न वैगरे ह्यावर तिचा विश्वास नव्हता . लग्न म्हणजे तडजोड, लग्न म्हणजे सर्वसामान्य बाब, आणि लग्न कधी हि करू शकतो त्याला वयाची अट  नाही , एवढ्या लवकर लग्न वैगरे म्हणजे खूपच होत , लग्न केलं म्हनजे बांधिलकी आली आणि ती आत्ता  तिला नको होती . आणि लग्न करायचाच तर settle person   बरोबर असं तिने पक्क ठरवलं होत . सुजय ला तिने नीट समजावून सांगितलं कि ह्या पगारात माझी कुठली स्वप्न पूर्ण होतील आणि मी जर खुश नाही राहू शकले तर तू पण कसा आनंदी राहशील . त्यातून तुझं  च घर म्हणजे जॉईन फॅमिली आई वडील मोठा भाऊ , एक बहीण  असं एकत्र कुटुंब नको कारण अनेक माणसं एकत्र आल्याने मतमतांतरे होऊन वाद होऊ शकतात. मला अजून खूप फिरायचं जग बघायचंय लग्नाच्या बंधनात अडकून नाही बसायचं . तू सुद्धा तुझ्या करिअर कडे लक्ष दे असच काही सांगून तिने तिचा नकार सुजय ला सांगून निघून गेली .

सुजय कितीतरी वेळ तिथेच सुन्न होऊन बसला होता , दोन तीन तासाने तो भानावर आला . आणि तसाच घरी निघाला . आज त्याला काहीच सुचत नव्हतं . सुनंदा बरोबर घालवले एक एक क्षण तो आठवत होता ... आणि मला एकदा सुद्धा का नाही समजलं कि तीच माझ्यावर प्रेम नाही .... किती मी वाहवत गेलो .. सगळंच जग त्याला स्तब्ध झाल्या सारखं झालं होत . खूप रडला त्या दिवशी  . घरी पोहोचल्यावर तो काही हि न बोलता सरळ त्याच्या रूम मध्ये निघून गेला , जेवायला सुद्धा नाही आला . आई ला वाटलं काम जास्त असेल दमला असेल म्हणून कुणी त्याला disturb नाही केलं  .

दुसऱ्या दिवशी सुजय ऑफिस ला पण नाही गेला .. बर नाही म्हणून घरीच होता रूम च्या बाहेर पण नाही आला . त्याच्या दादाला थोडा अंदाज आला काय झालं असावं पण नक्की काय झालय म्हणून तो सुजय च्या रूम मध्ये आला . सुजय काय झालय कालपासून पाहतोय तू शांत दिसतोस जेवलास पण नाही ,, खूप काम होत का ? कि ताप  आलाय ….बघू ? हे शब्द ऐकताच  सुजय दादाच्या कुशीत शिरून हुंदके देऊन रडू लागला दादाने त्याला मनसोक्त रडू दिल थोडा शांत झाल्यावर सुजय ने झालेला प्रकार दादाला सांगितलं . दादाने सुजय ची समजूत काढली , त्याला समजावलं अरे हे असं होत, सगळ्यांना सगळंच मिळत अस नाही , कधी कधी न मिळालेलंच बर  असं हि असत  . आणि सुनंदा म्हणते ते देखील खरं आहे अजून वय तरी काय तुमचं , करिअर कडे लक्ष द्यायलाच हवं ….अरे हे च तर वय आहे पुढे जायचं , जग बघायचं , ह्याच वयात तू जे करू शकशील ते कर , ह्या एका नकारला  तू positively घे , इतका सक्षम हो कि सुनंदाला आपण ह्याला नकार का दिला ह्याचा विचार करावा लागेल . आणि सुजय मी तुला लहानपणा पासून ओळखतो  तू हे challenge  नक्की पूर्ण करशील ह्याची मला खात्री आहे . रडणं सोड तिझ्यासाठी , उघड्या डोळ्याने या दुनिये कडे पाहा. तू हुशार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू handsome  आहे,, हो ना , अरे किती तरी मुली तुझ्या कडे मागे वळून बघतात ...  तुला तर कुठलाही style शोभून दिसत पण  अशा handsome  ला असं रडणं नाही शोभून दिसत . आणि आई म्हणते ना कि तू वेगळा आहेस , समजूतदार आहेस , तिचा श्रावणबाळ आहेस मग आई साठी हे असं रडणं थांबावं . असं रडत कुढत नको बसू ,उठ ऑफिस ला जा . आणि मस्त एक गिफ्ट घेऊन सुनंदाला दे आणि आनंदाने तिला निरोप दे . उठ फ्रेश हो ... आणि जा ऑफिस ला after all  Duty is Beautiful my boy . let’s back to work . ह्या अश्या छोट्या गोष्टींमुळे रडत नाही बसायचं तर हि एक आपल्याला मिळालेली शिकवून धडा आहे आयुष्याकडून असं समजायचं आणि पुढे अजून जोमाने नवीन सुरुवात करायची मग बघ तुझी गाडी कशी एक्सप्रेस way वर धावते . 

सुजय ला दादाच्या ह्या बोलण्याने हुरूप आला , तो ऑफिसला जायला तयार झाला , ऑफिस ला हि तो जस काही झालाच नाही असं वागत होता , पण मनात अजूनही वाटत होत कि सुनंदाने थांबावं माझ्या साठी , धावत येऊन म्हणावं....  नाही जात मी ,,, थांबते फक्त आणि फक्त तुझ्यासाठी . पण सुनंदाचा मूड काही वेगळाच होता, ती खूपच खुश होती आज सुनंदाचा शेवटचा दिवस होता ऑफिस मध्ये तिने एक छोटी party organised केली होती सगळ्या ना तिने invite केलेलं.   सुजय नाही गेला . तिच्या ते लक्षत आलं पण  तिने ते जास्त मनावर न घेता ती मुंबई shift झाली .

पहिले २ महिने सुजय ला खूप जड गेले त्याला सुनंदा ची खूप सवय झाली होती .. पण त्याने मनाशी ठरवलं होत कि त्याच प्रेम हे खूप निर्मळ होत . त्याने ते अगदी मनाच्या तळा पासून केलं होत . सुनंदाला ते नाही सजमजु शकलं ह्यात आपला तर नाही ना दोष . आणि ते माझं होत तर मी ते तिच्यावर का लादू  , ती एक खूप सुंदर आठवण आहे . हि तो कायम त्याच्या मनाच्या कपाटात खूप खाली तळाला जपून ठेवणार होता . एका सुगंधी अत्तराच्या कुपी सारखी . आणि एकांतात ती सुगंधी कुपी उघडून त्याचा मोहक सुगंध अनुभवायचा आणि परत तिला त्या कपाटात व्यवस्थित झाकून परत ठेऊन द्यायचं. वास आणि सुगंध आपल्या मनाच्या कल्पना आहेत...समोरच्याविषयी आपली भावना महत्वाची... चांगली भावना असेल तर सुगंधच सुगंध . सुजय न ते अत्तर खूप छान जपून ठेवलय त्याच्या मनाच्या एका कोपऱ्यात , कधीतरी आठवण आल्यावर ती कुपी उघडून त्या सुगंधात तो धुंद नाहून घेतो आणि परत फ्रेश मूड ने रोजच्या कामाला सुरुवात करतो


Gauri Ekbote