mazionjal

मंगळवार, १५ जून, २०२१

देव

 देव शेणमातीचा 

देव सोन्या चांदीचा 


देव पाषाणाचा 

देव तांब्या पितळेचा 


जसा ज्याचा भाव तसा  देवाचा असे ठाव 

ज्याची जशी भक्ती तशी मिळे देवाची प्रचिती 


शोधासी देवा आसमंतात 

तोच वसे फक्त तुझ्यात 

देव निर्गुण निराकार 

आदी अंत पूर्ण साकार 

देव निर्विकार व्यापक 

दृश्य अदृश्य निर्विकल्प 


देव सर्व व्यापक 

देव अनेकांत एक 

देव सगळ्याहून थोर 

स्थूल सूक्ष्म परमात्मा परमेश्वर 


संकटे हि अमाप 

तारणहार तो एक 

असमाधान हा रोग 

नाम तुझे हे त्यावरील औषध 


तळमळ वाढे जीवाची 

आस फक्त तुझ्या दर्शनाची 

ओढ वाढू दे तुझी 

गोडी वाढू दे नामाची 


 

गौरी 

इंतजार

 नाम तेरा हि है होटोपे 

एक आरजू है तुम्हे मिलने कि 


छोड दिया है घरदार सारा 

एक आस है तुम्हे पाने कि 


मिलोगे तुम हमे  जरूर 

जानता है दिल ए नादान 


गवरा नाही होगा मिलकर बिछडना 

ये इम्तिहान है मेरे इंतजार का  


गौरी 

Quote

 शब्दांना बहुतेक शाप मिळालाय वाटत 

खूप सुख आणि खूप दुःख ह्यापासून वंचित रहाण्याचा 

   ... गौरी 

गुरुवार, २० मे, २०२१

जुन्या वहीच शेवटचं पान



आज हि जर जुन्या वह्या सापडल्या ना कि पाहिलं पान न बघता सगळ्यात शेवटचं पान शोधते

किती तरी आठवणी त्या शेवटच्या पानाने अगदी जश्याच्या तश्या जपून ठेवलेल्या असतात न...

एखादी अशीच चार ओळींची छोटीशी सुचलेली कविता , मधेच एखादा कॅन्टीन चा हिशोब, कोणाचा तरी फोन नंबर , कुठला तरी address , कोणाचा तरी Mail ID , एखादी मेहंदी design किंवा रांगोळी design , चालू तासात फुली शून्याचा game , स्वतःच्या स्वाक्षरी चे वेगवेगळे प्रकार , किंवा अगदी चालू lectures  मध्ये जर काही सांगायचं असेल मैत्रिणीला तर ते पेन्सिलने लिहिले आणि बरच काही ... घेऊन जात थोडावेळा  करता का होईना त्या काळात.

 


शुक्रवार, ३० एप्रिल, २०२१

महाराष्ट्र माझा

 कोकणचा अथांग समुद्र, सह्याद्रीच्या डोंगराची किनार 

हिरवी सुंदर घनदाट जंगले , वन्यजीवसृष्टी अपार ,

माझ्या महाराष्ट्राच्या मातीने घडवले विविध कलाकार 

महिमा काय वर्णु मी , जन्मली इथेच सतार ।।


निसर्ग जसा सुंदर , इतिहास तितकाच रंजक 

शिवाजी महाराज आमचे हिंदवी स्वराज्य संस्थापक 

अनेक मावळ्यांनी केले रक्ताचे शिंपण 

महाराष्ट्र हे नाव झाले जगात अजरामर ।।


ज्ञानोबा तुकोबा ने धडा मानवतेचा शिकिवला 

संतांच्या ह्या वाटेवर महाराष्ट्र माझा चालला 

पंढरपूरच्या विठोबाला पायी वारीचा इतिहास 

 इथल्या मातीलाच आहे कष्टाचा सुवास ।।


पोवाडे , लावणी , भुरळ घालणारी कोळीगीत 

वारली कला , कोल्हापुरी चपला प्रसिद्ध इथली नाट्यगीत 

लेखक इथले देशपांडे , कुसुमाग्रज , बालकवी , शिवाजी सावंत 

माडगूळकर , शिरवाडकर , बहिणाबाई चौधरी, दुर्गा भागवत :।।


पुरणपोळी , थालीपीठ ,चकली अन चिवडा 

वडापाव, मिसळ , रस्सा मिळतो तांबडा - पांढरा 

खमंग ज्वारीची भाकरी आणि झणझणीत वांग्याचं भरीत 

हे सर्व माझ्या महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीत

गौरी एकबोटे...

सोमवार, ५ एप्रिल, २०२१

तमसो मा ज्योतिर्गमय

बस झालं कि आता , किती ते एखाद्याने दुसऱ्याच्या घरात ठाण मांडून बसायचं ,, जा.. रे... बाबा आता तुझा आम्हाला खूप कंटाळा आलाय !!!

 असच झालय ना सगळ्यांचं .... हो.. हो मी त्या कोरोना बद्दलच बोलते आहे. गेले एक संपूर्ण वर्ष झालं हा काही आपल्या घरातून जायचं नाव नाही घेत . शाळा तर बंद पाडल्याचं पण सगळे व्यवहार ठप्प केलेत , सारख आपलं फक्त कोरोना कोरोनाच , पेपर उघड ला कि कोरोना, TV लावला कि कोरोना , इंटरनेट ओपन केलं कि कोरोना जिथे तिथे फक्त तोच घुसून बसलाय . आपल सगळं जगच त्याने ओढून घेतलय एखाद्या ब्लॅकहोल सारख. 


आजीच्या गोष्टीत कस एक राक्षस होता तो सगळ्यांना त्रास द्यायचा, ऊत मात करायचा, उच्छाद मांडायचा , तसंच ह्या कोरोनाराक्षस ने सगळी कडे नुसता गदारोळ घातलाय, ना नवीन काही करू देत, ना आहे ते टिकाऊ देत . 

हा बाबा आपल्या घरात आला कि सगळं घर काय सगळी सोसायटी घरातच ह्याचा पाहुणचार करायला, कुठे बाहेर पण निघता येत नाही याची सरबत्ती करताना . आणि थोडे थोडके नाही तर १४ दिवस ह्याच्या मुळे quarantine व्हावं लागत . 

थोडं कुठे जरा बाहेर फिरून यावं म्हटलं तर तोंड बंद मास्क लावून , हाता मध्ये हँडग्लोव्हज नाही तर येतोय आहे आपल्या मागे घरात घुसायला . 

म्हणजे ह्याच्या भीतीने कुठे जात पण येत नाही ... किती ना छळवाद ... 


हो पण आजार सुद्धा काही तरी नवीन शिकवून जातो हे आपल्याला कोरोना ने शिकवलं , ह्याच्या मुळे आपल्याला स्वच्छतेचि सवय लागलीय , घर- घरातील मंडळींना आपण वेळ देऊ लागलोय हे हि तितकंच खरं. जस एखाद्या गोष्टीला दोन बाजू असतात तश्या ह्या कोरोनाची एक चांगली बाजू सुद्धा अनुभवायला आली, समजली उमगली , रोज ची जी धावपळ होती, आपली आणि घड्याळाची ती थोडी कुठे तरी थंडावली . एक शांतात अनुभवता आली हे पण तेवढं खरं

सुट्टीला कुठे तरी बाहेर जाण्या पेक्षा घरातच सगळ्या बरोबर सुट्टी ची ती लहानपाणीची मज्जा परत अनुभवता आली . रविवारी मस्त थोडं उशिरा उठून , मस्तपैकी आवडीचा नाश्ता करायचा , TV वर छान गाणी बघायची , सगळे एकत्र बसून एखादा मूवी बघायचा , दुपारी छान जेवण झाल्यावर ताणून वामकुक्षी घ्याची संध्याकाळी छान दिवा वैगरे लावून चहा पित संध्याकाळच गच्चीतल वेग वेगळ्या रंगाचं आभाळ , घरी परतणारे पक्षी बघायचे. जे दिवस खूप दिवसां पासून मिस करत होतो कि लहानपणी हे करायचो ते करायचो हे परत एकदा अनुभवता आले . फेसबुक वर मला आठवत एकदा मीच ते पोस्ट केलं होत काही फोटो बरोबर, गेल्या त्या आठवणी आणि राहिले ते दिवस ह्या हॅशटॅग ने. 


कोरोना हे संकट मोठं असलं तरी आपण सगळे ह्यावर एक दिवशी नक्की मत करू . कोणताही आजार नेहमी च सगळं हिरावून घेत नाही तर काही चांगल्या गोष्टी देखील देऊन जातो . आपण ह्या कोरोनाची चांगली बाजू बघू , नियम पाळू . ह्याने जी शिकवण दिलीये, जे धडे शिकवले ते गांभीर्याने घेउ आणि ते आयुष्य भर लक्षात ठेऊ . आणि ह्या कोरोना रुपि तमस, अंधकरातुन ज्योतिर्गमय |

सोमवार, ८ फेब्रुवारी, २०२१

पत्र, मनातलं...

 

प्रिय सुमित (आत्ताचा मुलांचा आणि माझा पण बाबा),

तर पत्र लिहिण्यास कारण कि (हो .. हो ... असं एकदम दचकू नको) फॉर्मॅलिटी   रे .... ते पत्र लिहिताना असतेच ना म्हणून  , म्हटलं लिहावं तुला....  नाही तरी सध्या आपण डायरेक्ट बोलतोच ... पण आठवत का तुला  आपण असे पण क्षण अनुभवले आहे कि त्यावेळेला तू मला आणि मी तुला ग्रीटिंग्स आणि त्या बरोबर एक पत्र लिहून पाठवायचो .

कसलं भारी वाटायचं ...... ते उघडून वाचे पर्यंत तर मला इतकी हूर हूर असायची आणि कधी एकदाच वाचते हे सगळं ,,, काय लिहिलं असशील तू  ... असं खूप काही एकदम वाटायचं , आधाश्या सारखं सगळं पटा पटा वाचायचे मी ....

तुला आठवत कॉलेज सुटल्यावर संध्याकाळी आपण भेटायचो ... बस स्टॅन्ड ला .... (आता जाम हसू येत आठवलं कि , बस स्टॅन्ड का तर येणारे जाणारे हे आजू बाजूला असणाऱ्या लोकं कडे  कमी लक्ष द्यायचे आणि बस कडे जास्त म्हणून ) आत्ता चल ना एकदा जाऊन बसू परत त्याच स्टॅन्ड ला .. खूप वाटत परत ते दिवस यावे .. मी माझ्या ladybird सायकल वर  आणि तू तुझ्या Hercules  वर यायचो ,,,, आता नको पण…. मी आणि तू नाही झेपणार त्या सायकल ला.

तुला आठवत कॉलेज संपल्यावर आपण घरी सांगायचं ठरवलं होत . भीती वाटत होती मला आई बाबा "नाही" तर म्हणणार नाही ना ... ते movies मध्ये दाखवतात …..तस मला कोंडून ठेवतील.  तुला भेटू देणार नाहीत वैगरे ... सॉलिड फिल्मी वाटत होत मला . पण आई बाबानी खूप छान समजून घेतलं आपल्याला . फक्त एक  अट होती त्यांची दोघांनी पण जॉब शोधायचा आणि मग लग्न . त्यावेळेला खूप राग आला होता त्यांचा पण आता कळतंय कि आपली खूप काळजी आहे त्यांना आणि आपल्यावर विश्वस देखील .

तो जॉब शोधण्याचा एका वर्षाचा काळ होता ना त्यात आपण मला आठवत फक्त दोनदाच भेटलो होतो ... मी ना तेव्हा एक कविता लिहिली होती.

आहे मनोहर परी गमते उदास

चांदणी हि रात्र , वर रातराणीचा सुवास

पूर्ण चंद्र नभात , चांदण्याची बरसात

एकटीच तळ्याकाठी पाहे साजणाची वाट

हूर हूर मनात , वाटेकडे डोळ्यांची आस

वाऱ्याची झुळूक देइ , मनाला आभास

तळ्यातही चांदण्या आहे चंद्राच्या सवेत

आहे मनोहारी रात्र परी गमते उदास

मस्त ना सुचायच मला तेव्हापासूनच  ..

तुला आठवतो आपला लग्ना नंतरचा पहिला व्हॅलेंटाइन डे ,,, धम्माल केली होती . आपण अगदी सुट्टी टाकून सकाळी मस्त वैशाली मध्ये मसाला डोसा , नंतर डायरेक्ट सिंहगड ,तिकडून संध्याकाळी खडकवासला च्या पाण्यात मस्त  पाय सोडून बसलो होतो  अगदी अंधार पडे पर्यंत तिथेच होतो . काय भारी वातावरण होत. फुल्ल टू रोमँटिक

आपलं नातं ना काळानुसार , सुख दुःख च्या ओढा ओढीत खूप मस्त फुललं . संसाराच्या ऊन सावलीने आपल्याला खूप काही शिकवलं , घडवलं, समजूतदार बनवलं. कधी कधी चा लटका राग आणि मोहक रोमॅंटिक रात्री पण मला अजूनही आठवतात आणि अंगावर शहारा येतो

आपलं हे असं फुलणं , उमलण , एकमेकांना समजून घेणं ह्या मुळेच असेल कदाचित खूप छान चाललंय आपलं आज १४ वर्ष  लग्नाला झाली  पण तरी असं वाटत ना कि आत्ता तर प्रेमात पडलो आपण.

कधी भांडण ,कधी रुसवा फुगवा

कारण तुझ्यात जीव गुंतला

कधी कठीण असे क्षण , कधी त्रासलेल मन

तरीही तुझ्यातच  जीव गुंतला

कधी तूझ खरं, तर कधी माझं खरं

पण तुझ्यात जीव गुंतला

कधी तुझं ताणून धरण, कधी माझं सोडून देणं

कारण तुझ्यात जीव गुंतला

कायम तुझीच असणारी,

मी